'स्वरानंद प्रतिष्ठान' : कार्यक्रम -उपक्रम

'स्वरानंद'ने आपल्या चार दशकांच्या वाटचालीत अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. त्यात 'आपली आवड' सारखा लोकप्रिय मराठी गाण्यांचा कार्यक्रम, 'मंतरलेल्या चैत्रबनात' हा गदिमा चित्रपटगीतांचा कार्यक्रम, 'पुलकित गीते' हा पु.ल.नी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांचा कार्यक्रम,' 'मी निरांजनातील वात' हा गजाननराव वाटवे यांच्या गाण्यांचा कार्यक्रम यांसारखे अनेक कार्यक्रम 'स्वरानंद'ने निर्मिले आहेत. 'जय जवान' सारख्या समर गीतांच्या एका आगळ्या कार्यक्रमाची निर्मिती स्वरानंद' ने केली आहे.

तसेच ' स्वरप्रतिभा ' ह्या पं.जितेंद्र अभिषेकींचा सांगीतिक मागोवा घेणाऱ्या दृक-श्राव्य कार्यक्रमाची तसेच 'वसंत नाट्य वैभव' ह्या वसंत कानेटकर यांच्या नाट्य कर्तुत्वाचा मागोवा घेणाऱ्या दृक- श्राव्य कार्यक्रमाची निर्मिती 'स्वरानंद' ने केली आहे.

नामवंत कलाकारांचे सत्कारसोहोळे, सुप्रसिद् बुजुर्ग कलाकारांच्या नावाचे पुरस्कार असे अभिनव उपक्रम 'स्वरानंद'ने सुरु केले आहेत.

भावगीत प्रकल्प, वाटवे करंडक भावगीत स्पर्धा असे नवे उपक्रम 'स्वरानंद'ने सुरु केले आहेत.

(अधिक माहितीसाठी क्लिक करा)

.

© Swaranand Pratishthan                                                                                                                                                                                       Created by : Maitreyi Graphics