'स्वरानंद' - पूर्व इतिहास

मराठी भावगीते, चित्रपटगीते, अभंग, लोकसंगीत इ . सुगम संगीताचे अविष्कार ही मराठी मनाची एक विरंगुळ्याची जागा या सर्वच प्रकारांना सुत्रबद्धरित्या एकत्रितपणे रंगमंच्याचा माध्यमातून सादर  करण्याचे काही  मनस्वी रसिकांच्या मनात आले .त्यातूनच 'स्वरानंद' हे नाव पुढे आले. 

 सुमारे चार दशकांपूर्वी पुण्यातील विश्वनाथ ओक , हरीश देसाई यांनी 'आपली आवड' या शिर्षकाखाली प्रथमच मराठी वाद्यवृन्दाचा कार्यक्रम केला. त्याला त्या काळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांचाबरोबर अरुण नूलकर , सुधीर दातार, अजित सोमण, सुहास तांबे, सुरेश करंदीकर, प्रकाश भोंडे या मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढे विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम होतच गेले. 

काहीजण वैयक्तिक अडचणींमुळे निवृत्त झाले.  नव्या उमेदीच्या कलाकारांची भर पडत गेली.  पण या स्थित्यंतरातही   'स्वरानंद' ची वाटचाल चालूच राहिली.केवळ मराठी सुगम संगीताचे रंगमंचीय कार्यक्रम करणारी 'स्वरानंद' ही एका अर्थाने आद्य संस्था म्हणून ओळखली जाते.

 

 

© Swaranand Pratishthan                                                                                                                                                                                       Created by : Maitreyi Graphics