भावगीत प्रकल्प

मराठी भावगीत हा आपल्या सर्वांच्या आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय आहे.  आधुनिक मराठी भाव कवितेला फुटलेली ही एक नितांत सुंदर शाखा हे मराठी कालाविश्वाचे एक खास वैशिष्टय.गेल्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी भावगीताची वाटचाल चालू झाली.  सुमारे ६० ते ६५ वर्षांच्या ह्या वाटचालीचा  समग्र सांगोपांग वेध घेण्याचा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत आहोत.  ह्या प्रकल्पाची मूळ कल्पना कवी, संगीतकार सुधीर मोघे यांची असून त्याची निर्मिती आणि प्रकाशनाची जबाबदारी 'स्वरानंद' पुणे ह्या संस्थेने स्विकारली आहे.


ह्या प्रकल्पाचे स्वरूप सामान्यत : असे असेल.

१.  मराठी भावगीत ह्या विषयाला अनुसरून साहित्याची उपलब्धी करून देणे ह्यामध्ये दुर्मिळ ग्रंथ, नियतकालिके, स्मरणिका, पत्रव्यवहार, संकीर्ण लेखन, ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती,छायाचित्रे इ. समावेश होईल.  
    
२.  वैयक्तिक स्वरुपात स्वयंसेवी भावनेने प्रत्यक्ष सहभाग.

३.  आर्थिक स्वरूपातील भरघोस सहकार्य- व्यक्ती आणि संस्था ह्या दोन्ही पातळ्यांवरून स्वरानंदसाठी देणग्यांना आयकर कलम ८०G अंतर्गत आयकरातून विशेष सवलत आहे

© Swaranand Pratishthan                                                                                                                                                                                       Created by : Maitreyi Graphics